Thursday, September 15, 2011

आताच्या शिरवळ गावाच्या साधारण मध्यावर पूर्वीच्या भोरकर महाराजांचा दोन चौकी, दुमजली वाडा आहे.या वाडयात बर्‍याचदा भोरचे राजेसाहेब रहायला येत.या वाडयाचे आवार बरेच मोठे आहे.या वाडयाची बांधणी साधीच आहे.पण बांधकाम मात्र मजबूत आहे.मोठे लाकडी दरवाजे आणि पहार्‍यासाठी दरवाजे आहेत.

आता या वाडयात रयत शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यालय आहे.याच वाडयातील पहिल्या चौकात माडीवर शिरवळ ग्रामपंचायतीचे कार्यालयसुद्धा होते.

हा वाडा आज मोडकळीस आला आहे.